संघर्षग्रस्त इराकमधील काही भागांतील भारतीयांना सुरक्षितरीत्या सुटका करण्यासाठी रालोआ सरकारसमोर सर्व पर्याय खुले असतील, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह बुधवारी दिली.
आम्ही सर्व पर्यायांचा विचार करत आहेत. काही महत्त्वाच्या सूचनाही आम्हाला मिळाल्या आहेत, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. इराकमधील भारतीयांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवण्याच्या पर्यायाबाबत विचारले असता त्यांनी भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले. इराकमधून आतापर्यंत ३४ जणांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, इराकमधील अराजकसदृश परिस्थितीबाबत सातत्याने परराष्ट्र मंत्रालयाकडून तेथील भारतीयांसाठी सातत्याने मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा