युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाची चीनने पुन्हा एकदा पाठराखण केलीय. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात रशियाने व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचं मत चीनने व्यक्त केलं असून याबद्दल गांभीर्याने विचार करणं गरजेचं असल्याचंही चीनने म्हटलंय. इतकच नाही तर चीनने एकीकडे रशियाला समर्थन देतानाच दुसरीकडे युक्रेनविषयावर बोलताना मृतांची संख्या वाढत असल्याबद्दल काळजी व्यक्त केलीय. रशियाचा थेटपणे विरोध न करता दुसऱ्या बाजूने युक्रेनची काळजी असल्याचं चीनने म्हटलंय. परिस्थिती हाताबाहेर जाण्यासंदर्भातही चीनने भाष्य केलंय. चीनच्या या दुटप्पी भूमिकेसाठी सध्या त्यांच्यावर टीका केली जातेय.
नक्की वाचा >> Ukraine War: युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भारतीय दूतावासातील…”
जीवाची आणि संपत्तीची हमी आवश्यक…
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ते वँग वेनबीन यांनी युक्रेनमधील संघर्षासंदर्भात चीनची भूमिका स्पष्ट केलीय. “लोकांच्या जीवाची आणि संपत्तीची हमी देणं आवशक्य आहे. मोठ्या प्रमाणात मानवी समस्या आणि मानवी जिवनाला बाधा पोहचवणारी संकट निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,” असं वँग म्हणाले.
नक्की वाचा >> Ukraine War: “तो किराणामालाच्या दुकानासमोर उभा होता, अन् तितक्यात…”; भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूचा घटनाक्रम
आमचा काहीही स्वार्थ नाही…
चीनने रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला विरोध केला नाही असा प्रश्न विचारण्यात आला असता वँग यांनी यामध्ये चीनचा काहीही स्वार्थ नसल्याचं म्हटलंय. “युक्रेन प्रकरणात आमचा कोणताही स्वार्थ नाहीय. आम्ही कायमच आमची भूमिका या प्रकरणासंदर्भातील घडामोडी लक्षात घेत ठरवलीय,” असं वँग यांनी सांगितलं.
आमचा व्यापार कायम राहणार…
रशियावर अमेरिका आणि युरोपियन देशांनी लादलेल्या निर्बंधांबद्दल विचारण्यात आलं असता या निर्बंधांनी समस्या सुटणार नाही असं चीनने म्हटलंय. “बेकायदेशीरपणे लादण्यात आलेल्या सर्व निर्बंधांना आमचा विरोध आहे. चीन आणि रशियामधील व्यापार सामान्यपणे सुरु राहणार आहे. दोन्ही देशांना एकमेकांबद्दल आदर आहे. दोन्ही देश समानता आणि एकमेकांच्या फायदा या तत्वावर काम करत राहणार आहेत,” असं चीनने म्हटलंय.
नक्की वाचा >> Ukraine War: “ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांवरुन नाव न घेता पटोलेंचा मोदींना टोला
परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी…
रशियाच्या आक्रमक धोरणामुळे युक्रेनमध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडत असल्याचसंदर्भात विचारलं असता वँग यांनी युक्रेन प्रश्नाला एक मोठा इतिहास असून काही गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं असल्याचं म्हटलंय. “युक्रेनमधील मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याबद्दल आम्हाला खेद आहे. सध्या जी परिस्थिती आहे ती आम्हाला अपेक्षित नाहीय. युक्रेनमधील परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच सर्व पक्षांनी (वादाशी संबंध असणाऱ्या सर्व देशांनी) यासंदर्भात योग्य त्या पद्धतीने नियंत्रण मिळवणं आणि संयम बाळगणे गरजेचं आहे,” असं वँग म्हणाले.
नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा
विद्यार्थ्यांची सुटका करण्यास सुरुवात…
चीनने मंगळवारपासून युक्रेनमधील आपल्या सहा हजार विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी मोहीम सुरु केलीय. “सध्या युक्रेनमधील चिनी नागरिक शेजारच्या देशांमध्ये जण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं वँग यांनी सांगितलं. युक्रेनमधील एक हजार चिनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय असंही ते म्हणाले. युक्रेनच्या शेजारील मोल्डोव्हा, स्लोव्हिया, रोमानिया आणि पोलंडमधील दूतावासाच्या माध्यमातून मदतकार्य सुरु असल्याचं सांगण्यात आलंय.