भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी समजताच, सर्व देशभरातून शोक व्यक्त करण्यात येतो आहे. भाजपच्या सर्व नेत्यांपासून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
I’m shocked to hear about the demise of Sushma Swaraj Ji, an extraordinary political leader, a gifted orator & an exceptional Parliamentarian, with friendships across party lines.
आणखी वाचाMy condolences to her family in this hour of grief.
May her soul rest in peace.
Om Shanti
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 6, 2019
सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 6, 2019
Saddened by the untimely death of Sushma Swaraj. She was a great Parliamentarian, a great orator and a warm human being. I remember the visit of our all-party Parliamentary delegation to Pakistan in 1999. She left her mark as the Leader of Opposition and also Foreign Minister. pic.twitter.com/oChedNQLay
— Prithviraj Chavan (@prithvrj) August 6, 2019
Shocked & saddened by this news. I last saw Sushmaji at @PMOIndia‘s swearing-in two months ago. She was a brilliant speaker in Hindi, a genuine “people’s person” in Government &I was proud of our excellent relationship when I chaired the External Affairs Committee. Om Shanti… https://t.co/1Q2kpUSj3x
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 6, 2019
आपल्या भाषणांच्या जोरावर सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात संसदेमध्ये सर्वांची मनं जिंकून घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू सुषमा स्वराज यांनी अतिशय कणखरपणे मांडली. अनेकदा सुषमा स्वराज यांच्यावर आरोपही झाले, मात्र प्रत्येकवेळी स्वराज यांनी संयम न सोडता प्रत्येक आरोपांना योग्य आणि समर्पक उत्तर दिलं होतं. स्वराज यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरही नेटीझन्सनी हळहळ व्यक्त केली आहे.