All Party meet on India G 20 Presidency: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने सोमवारी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला देशातील सर्वच राज्यांमधील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यासारखे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मोदींच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या सर्वपक्षीय बैठकीला हजर होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीसाठी दिल्लीला गेले नव्हते. उलट महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांसहीत घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेमध्ये त्यांनी १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्याची घोषणा मुंबईत केली. उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीसंदर्भात शिंदे यांनी दिल्लीमध्ये भाष्य करताना टोला लगावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा