पीटीआय, तिरुवनंतपुरम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोचिजवळील कलमस्सेरी येथे  रविवारी ख्रिस्ती समुदायाच्या प्रार्थनासभेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सोमवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यामध्ये समाजात अविश्वास आणि असहिष्णुता निर्माण करण्याचे प्रयत्न रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले, की या बैठकीत चिथावणीखोर निराधार-बिनबुडाचे आरोप, अफवा पसरवणे, पूर्वग्रहदूषित अनुमान काढणे आदी गैरप्रकारांपासून लांब राहण्याचा तसेच अविश्वास-असहिष्णुता पसरवण्याचे सर्व प्रयत्न रोखण्याचा संकल्प करण्यात आला.

दरम्यान, या स्फोटांत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तीन झाली आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या चार जखमींची प्रकृती गंभीर आहे. तर या साखळी स्फोटांचा तपास प्रभावीरित्या सुरू आहे, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोमवारी दिली.

हेही वाचा>>>>VIDEO : तेलंगणात बीआरएसच्या खासदारावर जीवघेणा हल्ला, प्रचारावेळी पोटात खुपसला चाकू

भाजपची केरळ सरकारवर टीका

केरळमधील डाव्या आघाडीचे सरकार कट्टर विचारसरणीबाबत सौम्य धोरण अवलंबत असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी केला. ‘हमास’च्या नेत्याने केरळमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित सभेला संबोधित केले. मात्र, या कार्यक्रमाविरुद्ध कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप नड्डा यांनी केला. 