कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जर देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली, तर ते समाजातील सर्व गटांना बरोबर घेऊन पुढे जातील, असे मत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केले. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली जाणार का, या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी हे मत व्यक्त केले. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
ते म्हणाले, जर राहुल गांधी यांना देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली, तर त्याचा समाजातील सर्व गटांना निश्चितच फायदा होईल, यावर माझा ठाम विश्वास आहे. राहुल गांधी हे सातत्याने देशाच्या विकासाचा आणि गरिबांच्या कल्याणाचाच विचार करीत असतात.
मध्य प्रदेश निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून कॉंग्रेसने शिंदे यांची निवड करून प्रदेशाध्यक्ष कांतिलाल भुरिया यांच्यावर अन्याय केला आहे, या भाजपच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपने माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलास्ते यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा