अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात निर्णय दिला आहे. भगवान हनुमानाविषयी केलेली पोस्ट ही अत्यंत धक्कादायक आणि आक्षेपार्ह आहे असं म्हणत या प्रकरणात कोर्टाने या प्रकरणातल्या आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला आहे. भगवान हनुमानाचा एक आक्षेपार्ह फोटो आरोपी राजेश कुमारने पोस्ट केला होता. त्या प्रकरणात कुठलाही दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.जस्टिस प्रशांत कुमार यांच्या पीठाने एफआयआरमध्ये जे आरोप आरोपीवर करण्यात आले आहेत ते धक्कादायक आहेत असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोर्टाने काय म्हटलं आहे?

अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलं आहे या प्रकरणाच्या गुण-दोषांमध्ये आम्ही पडायला नको. मात्र या व्यक्तीने जी पोस्ट केली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. न्यायालय या विषयात आपला निष्कर्ष काढू शकत नाही. मात्र राजेश कुमार या व्यक्तीने केलेली पोस्ट आणि त्यानंतर झालेलं आरोप पत्र त्यातले आरोप हे धक्कादायक आहेत. या प्रकरणात त्याला दिलासा देण्याचा काही प्रश्नच येत नाही असंही मत न्यायालयाने नोंदवलं आहे आणि सदर आरोपीला कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे. Live Law ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

राजेश कुमार याने भगवान हनुमानाविषयी एक अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. तसंच जो फोटो पोस्ट करण्यात आला होता तो अत्यंत वादग्रस्त होता. त्यामुळे त्याच्या विरोधातलं प्रकरण निकाली काढण्यास कोर्टाने नकार दिला आहे. या प्रकरणात कोर्टाने अमानुल्लाह आणि इतर बिहार राज्य तसंच ६ एसीसी ६९९ मध्ये जो अहवाल दिला गेला तो निर्णय देताना विचारात घेतला. यामध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की एकदा मॅजेस्ट्रेटकडून पुराव्यांचं अवलोकन करण्यात आलं की त्यानंतर प्राथमिक प्रकरण म्हणून नोंद घेतली जाते. सीआरपीसी कलम ४८२ च्या अंतर्गत हे प्रकरण असताना ते मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाहिलं जाऊ नये असंही कोर्टाने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allahabad hc denies relief to man accused of posting lord hanuman disrespectable picture on social media scj