पीटीआय, लखनऊ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये रामायणातील व्यक्तिरेखांची मांडणी ‘अत्यंत लज्जास्पद पद्धती’ने करण्यात आली आहे, अशा शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने बुधवारी निर्मात्यांवर ताशेरे ओढले. ‘कुराण’च्या संदर्भात असे काही केले गेले असते तर कायदा-सुव्यवस्थेची स्थिती काय असती, याची तुम्ही कल्पना करू शकता का, असा प्रश्नही न्यायालयाने केला.
चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्या. राजेश सिंह चौहान आणि न्या. श्रीप्रकाश सिंह यांच्या सुट्टीकालीन पीठासमोर सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने निर्मात्यांची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. ‘रामायण, कुराण, बायबल यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असतील तर त्यावर चित्रपट का तयार केले जातात? हिंदू समाजातील सहिष्णुतेमुळे चित्रपट निर्मात्यांनी मोठी चूक करूनही परिस्थिती बिघडलेली नाही’, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. त्याच वेळी कुराण किंवा बायबलसंदर्भात खटला दाखल झाला असता, तरी अशीच खंबीर भूमिका घेतली असती, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
‘मार्गदर्शक तत्त्वांची गरज’
अशा प्रकारचे चित्रपट तयार करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्याची गरज आहे. धार्मिक विषयांवर चित्रपट तयार करताना एखादा धर्म किंवा समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. – अलाहाबाद उच्च न्यायालय