Allu Arjun Pushpa 2 New Controversy : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ४ डिसेंबर रोजी त्याच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रीमिअर दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा जखमी झाला होता. या घटनेनंतर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ च्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. आता तेलंगणामधील एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने तेलगु सुपरस्टार अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘पुष्पा २ : द राईज’ या चित्रपटातील एका दृश्यात पोलिसांचा कथित अवमान केल्याचा मुद्दा उपस्थित करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसचे नेत थीनमार मल्लन्ना (Theenmar Mallanna) यांनी मेडीपल्ली पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे. अल्लू अर्जुनबरोबरच या तक्रारीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि निर्मात्यांची नावे देखील आहेत.

काँग्रेस नेत्याचा कोणत्या सीनवर आक्षेप?

थीनमर मल्लन्ना यांनी चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतला आहे. या सीनमध्ये चित्रपटाचा नायक (अल्लू अर्जुन) हा स्वीमिंग पूलमध्ये पोलीस अधिकारी असताना, त्या स्विमिंग पूलमध्ये लघवी करताना दिसत आहे. काँग्रेस नेत्याने हा सीन अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. तसेच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेला मानहानीकारक असल्याचा दावाही त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

आपल्या तक्रारीत काँग्रेस नेत्याने चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्यासह चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांची प्रतिमा अक्षेपार्हरित्या दाखवल्याप्रकरणी त्यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अल्लू अर्जुनला पोलिसांची नोटीस

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रीमिअर दरम्यान ४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा मुलगा जखमी झाला होता. अल्लू अर्जुन पोलिसांनी परवानगी नाकारूनही प्रीमियरला उपस्थित राहिला होता. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली होती आणि सध्या तो जमीनावर बाहेर आला आहे. महिलेचा पती भास्कर यांने तो अभिनेता अल्लू अर्जुनविरोधातील गुन्हा मागे घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. यादरम्यान पोलिसांनी अल्लू अर्जुनला मंगळवारी ११ वाजता हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा>> Allu Arujn : अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या! चौकशीसाठी पुन्हा समन्स, पोलीस उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

राजकीय आरोप

या प्रकरणात सध्या राजकीय हस्तक्षेप देखील होताना दिसत आहेत. तेलंगणामधील विरोधीपक्ष भाजपा आणि भारत राष्ट्र समितीने अल्लू अर्जुनच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षांनी दावा केला आहे की रविवारी (२२ डिसेंबर) अल्लूच्या घरावर हल्ला करणारे काही जण हे रेवंथ रेड्डी यांच्या कोडांगल विधानसभा मतदारसंघातील आहेत.

दरम्यान अल्लू अर्जुनच्या घरावर टोमॅटो फेकल्याप्रकरणी आणि फ्लॉवर पॉट्सचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली उस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचा दावा करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun pushpa 2 new controversy congress leader files complaint over scene in movie director sukumar rak