अल्ट न्यूज या फॅक्ट चेकिंग वेबसाईटचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केलं आहे. धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १५३/२९५ नुसार झुबेर यांच्याविरोधात कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आलं आहे.

हेही वाचा >> सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवांवर बलात्काराचा आरोप, दिल्लीमध्ये गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांनी काय सांगितले?

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद झुबेर यांनी एका विशिष्ट धर्माविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. झुबेर यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. हा एक फोटो लोकांच्या मनात द्वेष निर्माण करण्यास पुरेसा होता. झुबेर यांनी हे कृत्य मुद्दामहून केले होते, असा आरोप ठेवत दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केलं आहे.

हेही वाचा >> अयोध्येत सापडले बेवारस अवस्थेत १८ हातबॉम्ब; परिसरात खळबळ

झुबेर यांच्या समर्थांकांनी केले आरोप

तर दुसरीकडे झुबेर यांच्या अल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा यांनी दिल्ली पोलिसांवर आरोप केला असून झुबेर यांच्या अटकेनंतर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मोहम्मद झुबेर यांना २०२० सालच्या एका प्रकरणाशी निगडित चौकशीसाठी बोलावले असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. या प्रकरणात झुबेर यांना याअगोदरच उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिलेला आहे. मात्र सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजता त्यांना कोणत्यातरी दुसऱ्याच आरोपांतर्गत अटक करण्यात आल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे,” असा आरोप सिन्हा यांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >> बंडखोर आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याने ११ जुलैआधी बहुमत चाचणी होणार की नाही?; सर्वोच्च न्यायालय म्हणालं…

दरम्यान, झुबेर यांच्या अटकेनंतर देशपातळीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेकांनी दिल्ली पोलिसांच्या या कारवाईला विरोध केला आहे. राहुल गांधी यांनीदेखील ट्वीट करत दिल्ली पोलिसांचा निषेध केला. “भाजपाचा द्वेष, खोटारडेपणा उजेडात आणणारी प्रत्येक व्यक्ती भाजपासाठी धोकादायक आहे. सत्या सांगणाऱ्या एका आवाजाला अटक केलं तर हजारो आवाज आणखी येतील. अत्याचारावर सत्याचाच विजय होतो,” असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.

Story img Loader