समाजवादी पक्षातून हकालपट्टी केलेले उत्तर प्रदेशातील नेते अमरसिंह आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी सोमवारी अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षात प्रवेश केला. अजित सिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अमरसिंह आणि जयाप्रदा यांनी राष्ट्रीय लोकदल पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर लगेचच अमरसिंह यांनी उत्तर प्रदेश विभाजनाची मागणी केली.
राष्ट्रीय लोकदल पक्षाने कॉंग्रेससोबत निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. उत्तर प्रदेशातील आठ जागांवर राष्ट्रीय लोकदल आपले उमेदवार उभे करणार आहे. अमरसिंह आणि जयाप्रदा यांना राष्ट्रीय लोकदल लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
अमरसिंह आणि जयाप्रदा या दोघांची २०१० मध्ये समाजवादी पक्षाने हकालपट्टी केली होती. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हकालपट्टी करण्यात येत असल्याचे कारण समाजवादी पक्षाने त्यावेळी दिले होते.

Story img Loader