चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे (पीएलसी) प्रमुख अमरिंदर सिंग पुढील आठवडय़ात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की सिंग आपल्या स्थापन केलेल्या पक्षाचेही भाजपमध्ये विलीनीकरण करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी काँग्रेस सोडताना मुख्यमंत्रिपदाचा अचानक राजीनामा देऊन पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली होती. दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार आहेत.

‘पीएलसी’चे प्रवक्ते प्रीतपाल सिंग बलियावाल यांनी सांगितले, की ‘पीएलसी’मध्ये सामील झालेले सात माजी आमदार आणि एक माजी खासदारही सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुढील आठवडय़ात चंडीगडमध्ये एका कार्यक्रमात इतर पक्ष पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपच्या पंजाब शाखेचे नेते हरजितसिंग ग्रेवाल यांनी जुलैत सांगितले होते, की सिंह यांनी लंडनला जाण्यापूर्वी त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा मानस व्यक्त केला होता. अमरिंदर सिंग लंडनहून परतल्यानंतर विलीनीकरणाची घोषणा करतील, असेही ग्रेवाल यांनी त्यावेळी सांगितले होते.

मोदी- शहा यांची भेट

मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर नुकतेच लंडनहून परतलेल्या अमिरदर सिंग यांनी गेल्या पंधरवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. अमित शहा यांच्याबरोबर १२ सप्टेंबर रोजी झालेल्या भेटीनंतर सिंग यांनी सांगितले होते, की राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दय़ांवर, पंजाबमधील अमली पदार्थ-दहशतवादाची वाढती प्रकरणे आणि राज्याच्या सर्वागीण विकासासाठी भविष्यातील वाटचालीवर त्यांनी चर्चा केली.