Amarnath Cloudburst : अमरनाथमधील पवित्र गुहा परिसरात ढगफुटी झाली असून येथे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ढगफुटी झालेल्या भागामध्ये अनेक भाविक अडकले असून बचावकार्य सुरु आहे. या यात्रेला ३० जूनपासून सुरुवात झाली आहे. पवित्र अमरनाथ गुहेपासून दोन किलोमीटरवर ही ढगफुटी झाली आहे.

हेही वाचा >>> “…तर आम्हाला सत्तेची पर्वा नाही,” शिंदे गटातील आमदाराचा भाजपाला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा

अमरनाथ गुहेच्या परिसरात आज संध्याकाळी ५.३० वाजता ढगफुटी झाली. ढगफुटीमुळे पाणी आल्यामुळे येथे एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिला तर दोन पुरुष भाविकांचा समावेश आहे. या घटनेनंतर गुहा परिसरात अनेक यात्रेकरू अडकले असून एनडीआरएफ तसेच एनडीआरपीच्या जवानांकडून बचावकार्य केले जात आहे.

हेही वाचा >>> पुढील ३ दिवस राज्यात अतिवृष्टीची शक्यता, ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

या घटनेबाबात काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे. “पवित्र गुहेच्या परिसरात ढगफुटी झाल्यामुळे गुहेच्या पायथ्याशी असलेले काही टेंट पाण्यात वाहून गेले आहेत. जखमी झालेल्या भाविकांना हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे,” असे विजय कुमार यांनी सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> “मला VIP ट्रीटमेंट नको, माझ्या ताफ्यासाठी सर्वसामान्यांच्या गाड्या अडवू नका”; स्पेशल प्रोटोकॉल पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पर्वतांमधून जोरदार हवा तसेच पावसामुळे भाविकांचे २५ टेंट वाहून गेले आहेत. तर पावसामुळे येथील परिसरात पाणी साचलेले आहे. सध्या एनडीआरएफ तसेच यायटीबीपीच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.

Story img Loader