श्रीनगर : ४० हजारांहून अधिक भाविकांनी रविवारी सकाळपर्यंत अमरनाथ गुंफेतील पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. तर यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे.
अमरनाथ यात्रेकरूंपैकी विरेंदर गुप्ता हा चंदनवाडी शेषनाग मार्गावरून बेपत्ता झाला आहे. तर तिघा भाविकांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. दिल्लीतील जय प्रकाश यांचा चंदनवाडीत, तर बरेली येथील गुंफेजवळ देवेंद्र तयाल (५३) यांचा मृत्यू झाला. लिपो शर्मा (४०) या बिहारमधील रहिवाशाचा काझीगुंड शिबिरात मृत्यू झाला. जगन्नाथ (६१) या महाराष्ट्रातील भाविकाचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे पिस्सूटॉप येथे आणि अशू सिंग (४६) या राजस्थानमधील भाविकाचा एमजी टॉप येथे घोडय़ावरून पडून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत ४० हजार २३३ भाविकांनी अमरनाथमधील गुंफेतील पवित्र शिविलगाचे दर्शन घेतले.
४३ दिवसांच्या अमरनाथ यात्रेला ३० जून रोजी सुरुवात झाली आहे. तिचा समारोप ११ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी होणार आहे.