बीएसएफ जवानांच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू
सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याने रामबन येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरच्या रामबन जिल्ह्यात बीएसएफच्या तळावर काल(गुरूवार) जमावाने दगडफेक केल्याने प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर बीएसएफ विरोधात स्थानिक नागरिकांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. त्यामुळे आज शुक्रवार सकाळी अमरनाथ यात्रेला स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेनंतर रामबन जिल्ह्यात संचारबंदी जारी करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपुर्ण श्रीनगर, बुधगम, बंदीपोरा जिल्हा, पुलवामा, कुलगम,बीजबीहारा आणि अनंतनाग परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Story img Loader