बीएसएफ जवानांच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू
सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याने रामबन येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरच्या रामबन जिल्ह्यात बीएसएफच्या तळावर काल(गुरूवार) जमावाने दगडफेक केल्याने प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर बीएसएफ विरोधात स्थानिक नागरिकांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. त्यामुळे आज शुक्रवार सकाळी अमरनाथ यात्रेला स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेनंतर रामबन जिल्ह्यात संचारबंदी जारी करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपुर्ण श्रीनगर, बुधगम, बंदीपोरा जिल्हा, पुलवामा, कुलगम,बीजबीहारा आणि अनंतनाग परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
रामबन परिसरात तणावाचे वातावरण; अमरनाथ यात्रा स्थगित
बीएसएफ जवानांच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याने रामबन येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-07-2013 at 11:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amarnath yatra suspended as tension prevails over bsf firing in ramban