अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस आपल्या पत्नीपासून विभक्त होत आहेत. बुधवारी ट्विट करत त्यांनी पत्नीला घटस्फोट देत असल्याची माहिती दिली. 25 वर्षाच्या संसारानंतर जेफ बेझॉस आणि मॅकेन्झी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ बेझॉस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे 137 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. जेफ बेझॉस यांनी 1994 मध्ये अॅमेझॉनची स्थापना केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेफ बेझॉस यांनी ट्विटरवर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘आमचं कुटुंब आणि जवळच्या मित्रांना ज्याप्रकारे माहिती आहे की, प्रेमाने भरलेल्या एका दिर्घ काळानंतर आणि घटस्फोटाच्या प्रक्रियेनंतर आम्ही सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही एकमेकांचे मित्र म्हणून पुढील आयुष्य जगू. जर आम्हाला माहिती असतं की 25 वर्षांनी आम्ही विभक्त होणार आहोत तर आम्ही याची पुनरावृत्ती करु’.

महत्त्वाचं म्हणजे मॅकेन्झी या अॅमेझॉन कंपनीच्या पहिल्या कर्मचारी होत्या. जेफ आणि मॅकेन्झी यांची भेट डी.ई शॉमध्ये झाली होती. ही भेट अॅमेझॉनची स्थापना होण्याआधी झाली होती. घटस्फोट झाल्यानंतरही अनेक प्रोजेक्ट आणि उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र राहू अशी आशा जेफ आणि मॅकेन्झी यांनी व्यक्त केली आहे. जेफ आणि मॅकेन्झी यांना चार मुलं आहेत.