आयुष्य अत्यंत क्षणभंगूर असतं. आपला मृत्यू कधी दारात येऊन उभा राहिल याची काहीही शाश्वती नसते. असाच एक प्रकार आंध्र प्रदेश येथे घडला आहे. मित्राच्या लग्ना नववराला आहेर देतानाच एका तरुणाचा तोल गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले असून व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात हा धक्कादायक प्रकार घडला. मित्राला भेटवस्तू देत असातना एका तरुणाला अचानक हृदयविकारामुळे मृत्यू झाला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये बेंगळुरूमधील ॲमेझॉनमध्ये कार्यरत असलेला कर्मचारी वामसी नवदाम्प्त्याला स्टेजवर शुभेच्छा देताना आणि त्यांना भेटवस्तू देताना दिसत आहे. वामसी त्याच्या मित्राच्या लग्नासाठी बेंगळुरूहून कुर्नूलमधील पेनुमुडा गावात गेला होता.

हेही वाचा >> तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढतेय? याचा अपचनाशी काही संबंध आहे का?

वराने भेटवस्तूचे रॅपर उघडण्यास सुरुवात केली असता वामसीचा तोल सुटू लागला आणि त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी त्याला पकडले, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. वामसीला तातडीने ढोणे शहरातील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon employee dies of heart attack while giving gift at friends wedding in andhra pradesh sgk