मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा यांच्यासारख्या काही जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे. त्यानंतर अ‍ॅमेझॉन ही कंपनीदेखील वेगवेगळ्या विभागांतून तब्बल १० हजार कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. उलाढाल मंदावल्यामुळे तसेच महसुलात घट होत असल्यामुळे कंपन्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच अ‍ॅमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष तसेच जगतील अब्जाधीशांच्या यादीत समावेश असलेले जेफ बेझोस यांनी लोकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. लवकरच आर्थिक मंदी येण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच बेझोस यांनी केले आहे. आपल्या खिशात सध्या पैसे राखून ठेवा. मोठ्या वस्तुंची घरेदी करण्याचे टाळा, असे बेझोस म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> कोश्यारींच्या विधानावर मुनगंटीवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया; बाळासाहेब ठाकरे, पवारांचं उदाहरण देत म्हणाले “त्यांनी कालबाह्य हा शब्दच…”

सीएनएन या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना बेझोस यांनी वरील विधान केले आहे. “सध्या कोणतीही जोखीम पत्करू नका. तुमच्याकडील पैसे राखून ठेवा. थोडीजरी जोखीम टळली तरी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही सध्या मोठ्या स्क्रीनचा टीव्ही, शितकपाट, किंवा नवे महागडे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आणखी थोडी वाट पाहा. तुमचे पैसे सध्यातरी राखून ठेवा. सध्या अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत नाही. सध्या अनेक क्षेत्रांमधील कंपन्या नोकरपात करत आहे. उलाढाल मंदावली आहे,” असे सूचक विधान जेफ बेझोस यांनी केले आहे.

हेही वाचा >>> Shraddha Murder Case: आम्ही आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी…; श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा

याच मुलाखतीत बोलताना काही संपत्ती दान करणार असल्याचे बेझोस यांनी सांगितले. जे लोक मानवतेसाठी काम करत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी माझ्या संपत्तीतील काही भाग दान करणार आहे, असे बेझोस म्हणाले आहेत.