Amazon Layoffs Started : ट्विटर, मेटा या जगप्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आता अॅमेझॉन कंपनीतही मोठी कर्मचारी केली जात आहे. या कर्मचारी कपातीची अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जासी यांनी पुष्टी केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकूण १८००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून ही प्रक्रिया सुरूदेखील झाली आहे. भारतातही या प्रक्रियेस सुरुवात झाली असून मिळालेल्या माहितीनुसार भारतात एकूण १००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे.
हेही वाचा >>> बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?
अॅमेझॉन कंपनीत कर्मचारी कपातीला सुरुवात झाली आहे. या निर्णयांतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यता आला आहे, ते आता इतर ठिकाणी नोकरी शोधत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी ट्विटर तसेच LinkedIn वर तशा पोस्ट केल्या असून नव्या नोकरीच्या शोधात आहोत, असे सांगितले आहे. भारतातही ही कर्मचारी कपात केली जात आहे. भारतातील बंगळुरू, गुरुग्राम तसेच अन्य कार्यालयांतून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जात आहे. यामध्ये फ्रेशर्स तसेच कामाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
हेही वाचा >>> Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; ११ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती
कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केल्याचा निर्णय मेलद्वारे सांगितला जात आहे. तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येत आहे. तुमच्या टीम लिडरची भेट घ्या. तसेच तुमच्या नोकरीची नेमकी काय स्थिती आहे याबाबत त्यांच्याकडून जाणून घ्या, असे या मेलद्वारे सांगण्यात येत आहे. तसेच याच मेलमध्ये अॅमेझॉन कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ५ महिन्यांचे सेपरेशन पगार (Separation Payment) देण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.
हेही वाचा >>> ट्विटर, मेटा, गुगलनंतर आता Amazon चा दणका! हजारो कर्माचाऱ्यांना नोकरीवरून काढणार, CEO म्हणाले, ” या तारखेपासून…”
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अॅमेझॉनमधील नोकरपातीची ही प्रक्रिया आणखी काही आठवडे चालणार आहे. कर्मचाऱ्यांना सेपरेशन पगाराव्यतिरिक्त, वैद्यकीय विमा, दुसरीकडे नोकरी शोधण्यासाठीही अॅमेझॉनकडून मदत केली जात आहे.