इसिस या जिहादी संघटनेचे इंग्रजी भाषेतील प्रचारकी नियतकालिक ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन रिटेलर कंपनीने काही काळ विकायला ठेवले होते. इसिसच्या ‘डाबिक’ या नियतकालिकाच्या चार प्रती पेपरबॅक आवृत्ती अ‍ॅमॅझॉनच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आल्या होत्या. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली व स्पेन या देशांमधील संकेतस्थळांवर ही नियतकालिके ठेवण्यात आली होती. या नियतकालिकाची निर्मिती अल हयात मीडिया सेंटर ने केली आहे. ही संस्था इसिसची प्रचारकी व्हिडिओ व वार्तापत्रेही तयार करते.
इस्लामिक स्टेट ही इंग्लंड, भारत, अमेरिका या देशांमध्ये प्रतिबंधित संस्था आहे. दाबिक हे नियतकालिक जिहाद, इसिसच्या लढाईची छायाचित्रे, चालू घडामोडी यावर लेख प्रसिद्ध करते, त्याची किंमत २७ पौंड आहे. दाबिक हे सीरियातील एक गाव असून त्याचे नाव या नियतकालिकाला ठेवले असून ते २०१४ पासून सुरू करण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर प्रकाशकाचे नाव ‘क्रिएट स्पेस इंडिपेन्डंट पब्लिशिंग प्लॅटफॉर्म’ असे आहे, पण ती अ‍ॅमॅझॉनची प्रकाशन संस्था असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
आता हे नियतकालिक विक्रीस उपलब्ध नाही असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. कंपनीने इतर माहिती दिली नाही. इसिस किंवा आयएस हा अल काईदाचा फुटीर गट असून त्यांनी इराक व सीरियाचा शेकडो चौरस मैल भाग ताब्यात घेतला आहे. अल काईदाने मात्र आमचा इसिसशी संबंध नसल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा