पीटीआय, नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आदरांजली वाहिली. संसदेच्या संकुलात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. आंबेडकरांच्या संघर्षांने लाखो लोकांना आशा व प्रेरणा मिळाल्याचे मोदींनी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले. त्यांनी म्हटले, की महापरिनिर्वाणदिनानिमित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतो व त्यांच्या देशासाठी केलेल्या अनुकरणीय सेवेचे स्मरण करतो. भारताला इतके व्यापक संविधान देण्याचे त्यांचे प्रयत्न कधीही विसरता येणार नाही.