अभूतपूर्व गोंधळात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी यांनी लोकपाल विधेयक संसदेत सादर केले. मात्र समाजवादी व तेलुगू देसम पक्षाच्या गोंधळामुळे त्यावर चर्चा होऊ शकली नाही. लोकपाल विधेयकावर चर्चा करण्यासाठी सहा तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, मात्र वाढत्या महागाईविरोधात उभय पक्षांची निदर्शने सुरूच राहिल्याने सभापती अन्सारी यांनी राज्यसभेचे कामकाज सोमवापर्यंत तहकूब केले.
कामकाज सुरू झाल्या-झाल्या सप, तेलुगू देसम पक्षाच्या सदस्यांनी वाढत्या महागाईविरोधात घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्याच वेळी तेलंगणाला विरोध करणाऱ्या सदस्यांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. या गोंधळातच सामी यांनी लोकपाल विधेयक सादर केले. दुपारी अडीच वाजेपर्यंत अन्सारी यांनी कामकाज तहकूब केले. त्यानंतही गोंधळ कायम राहिला. विरोधक अत्यंत आक्रमक झाले होते. समाजवादी पक्षाचे सदस्य सभापतींच्या समोर असलेल्या सज्जात दाखल झाले. शांत राहण्याची, आपले स्थान ग्रहण करण्याची सभापतींची विनंती या सदस्यांनी अक्षरश: धुम्डकावून लावली. अखेरीस हतबल झालेल्या अन्सारी यांनी कामकाज तहकूब केले. दोन्ही सभागृहांचे कामकाज गेल्या आठवडाभरात एकही दिवस सुरळीत पार पडले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा