देशात दिवसेंदिवस बाल लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान, अमेरिकेतील एका संस्थेनं बाल लैंगिक अत्याचाराबाबतची मध्य प्रदेशातील धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे.

यूएसमधील ‘नॅशनल सेंटर फॉर मिसींग अँड एक्स्प्लॉयडेट चिल्ड्रेन’ (NCMEC) या संस्थेनं बाल लैंगिक अत्याचार संबंधित साहित्य, चित्रफित व्हायरल करणाऱ्या मध्य प्रदेशातील ३० हजारांहून अधिक जणांना शोधून काढलं आहे. यामध्ये लहान मुलांचं पॉर्नोग्राफिक साहित्य व्हायरल करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.

Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
Four people from Dombivli arrested, Kalyan girl selling,
कल्याणमध्ये दीड महिन्याच्या बालिकेची विक्री करणाऱ्या डोंबिवलीतील चार जणांना अटक
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई

NCMEC या सस्थेचा अहवाल समोर आल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याची योजना आखली आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या तपशीलाच्या आधारे मध्य प्रदेशातील चार हजाराहून अधिक घटना कारवाईयोग्य असल्याचं समोर आलं आहे. तर इतर २६ हजार प्रकरणांची छाननी सुरू आहे. याप्रकरणी राज्य सायबर सेलने संभाव्य अटक केल्या जाणाऱ्या लोकांची यादी १० जिल्ह्यांना पाठवली आहे. याबाबतचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने गृहमंत्रालयातील सूत्रांच्या आधारे दिलं आहे.

हेही वाचा- १४२ वर्षांचा तुरुंगवास! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोर्टानं सुनावली शिक्षा

विशेष म्हणजे भारतातील सर्वात मोठा भरती घोटाळा व्यापममध्ये सुमारे साडेतीन हजार लोकांना अटक केली होती. पण NCMEC अहवालावरून मध्य प्रदेशात ४ हजाराहून अधिक लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. यातील सर्वाधिक प्रकरण इंदूरमधील असून येथे दोन हजाराहून अधिक प्रकरणं नोंदली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भोपाळ असून येथे एक हजाराहून अधिक प्रकरणं नोंदली आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी ‘टीओआय’ला दिली.