ब्रिटनच्या गव्हर्नमेंट कम्युनिकेशन हेडक्वार्टर्स (जीसीएचक्यू) या गुप्तचर संस्थेने जागतिक फोन कॉल्सची सुविधा व इंटरनेट ज्या ऑप्टिकल केबल्समुळे चालते त्यातून ही माहिती घेतली, एवढेच नव्हे तर अतिशय संवेदनशील माहिती अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सी म्हणजे एनएसए या गुप्तचर संस्थेला पुरवली, असे द गार्डियन या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
अमेरिकेतील माहिती टेहळणीचा पर्दाफाश करणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने जी माहिती बाहेर काढली त्यातूनच हे स्पष्ट होत असून अमेरिका व ब्रिटन यांच्या गुप्तचर संस्थांचे टेहळणीच्या कामात साटेलोटे असल्याचे दिसून आले आहे. ऑनलाइन व टेलिफोनच्या माध्यमातून जाणारी माहिती चोरण्याकरिता इंटरनेट व दूरसंचार व्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा जीसीएचक्यूचा इरादा स्पष्ट झाला आहे. कुणाच्याही परवानगीशिवाय ही माहिती अमेरिकेला देण्यात आली. विशेष म्हणजे
जीसीएचक्यू या ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने ऑप्टिकल केबलमधून चोरलेली प्रचंड माहिती किमान तीस दिवस साठवून ती दुसरीकडे पाठवणे व त्याचे विश्लेषण करणे या क्षमता प्राप्त केल्या होत्या तसेच हा माहिती चोरीचा उद्योग टेम्पोरा या सांकेतिक नावाने चालवण्यात आला. संशयित व्यक्ती व निरपराध लोक यांच्या माहितीचा यात मोठय़ा प्रमाणात समावेश होता. त्यात फोन कॉलचे रेकॉर्डिग, फेसबुक नोंदी, इंटरनेट वापरकर्त्यांच्या संगणकावरची हिस्टरी म्हणजे त्याने कुठल्या वेबसाईट पाहिल्या त्याची माहिती यात घेण्यात आली. मानवी इतिहासातील अतिशय मोठा माहिती टेहळणीचा कार्यक्रम असे वर्णन स्नोडेन याने या सर्व प्रकरणाच्या संदर्भात केले होते. ब्रिटनच्या जीसीएचक्यू या संस्थेने अमेरिकेपेक्षाही जास्त माहिती चोरली आहे, त्यामुळे हा फक्त अमेरिकेचा प्रश्न नाही असे स्नोडेन याने द गार्डियनला सांगितले. गुप्तचर कारवायांमधील एका माहीतगार व्यक्तीने सांगितल्यानुसार अशा प्रकारे माहिती गोळा करणे हे कायदेशीर आहे कारण त्यातून गंभीर गुन्ह्य़ांची उकल होऊ शकते. जीसीएचक्यू या संस्थेची माहिती चोरण्याची क्षमता बघता या संस्थेला गुप्तचर कामातील महाशक्ती म्हणता येते.
इ.स. २०१० मध्ये म्हणजे हा प्रकल्प राबवल्यानंतर दोन वर्षांनी या संस्थेने अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या सदस्य देशांशी संबंधित इंटरनेट माहिती मिळवण्यात जीसीएचक्यूने आघाडी घेतली होती. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, जीसीएचक्यूने अमेरिकेच्या एनएसएपेक्षा जास्त मेटाडाटा (म्हणजे कुणी कुणाला फोन केले, किती वेळा केले ही माहिती पण काय बोलले त्याचा तपशील नाही) मिळवला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जीसीएचक्यूने ३०० तर अमेरिकेच्या एनएसएने २५० तज्ञांना या माहितीचे खोदकाम करण्याच्या कामात गुंतवले होते. एनएसएचे साडेआठ लाख कर्मचारी व अमेरिकी खासगी कंत्राटदार यांना जीसीएचक्यू डेटाबेसमधील माहिती उपलब्ध करण्यात आली होती. जीसीएचक्यूने गेल्या वर्षी प्रत्येक दिवशी ६०० दूरध्वनी संभाषणांची नोंद केली, तर २०० फायबर ऑप्टिक संदेश टॅप केले व त्यातील ४६ प्रकरणातील माहितीवरप्रक्रिया केली जात होती.
माहिती चोरीत अमेरिका व ब्रिटनचे साटेलोटे ?
ब्रिटनच्या गव्हर्नमेंट कम्युनिकेशन हेडक्वार्टर्स (जीसीएचक्यू) या गुप्तचर संस्थेने जागतिक फोन कॉल्सची सुविधा व इंटरनेट ज्या ऑप्टिकल केबल्समुळे चालते त्यातून ही माहिती घेतली, एवढेच नव्हे तर अतिशय संवेदनशील माहिती अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सी म्हणजे एनएसए या गुप्तचर संस्थेला पुरवली, असे द गार्डियन या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
First published on: 23-06-2013 at 02:00 IST
TOPICSएनएसए
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America and britain are companions in haking information