हमासने अचानक इस्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. यानंतर इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादच्या अपयशावरही जोरदार चर्चा झाली. यानंतर हमासने केलेल्या या हल्ल्यात इतर कुणाचा सहभाग आहे का अशी शंका उपस्थित केली गेली. यात हमासच्या हल्ल्याला इराणची मदत असल्याचाही आरोप होत आहे. यावर अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते आणि वायू दलाचे ब्रिगेडीयर जनरल पॅट रायडर यांनी प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅट राडयर म्हणाले, “आम्ही हमासने केलेल्या हल्ल्याचा सातत्याने अभ्यास करत आहोत. यावर आम्ही जवळून लक्ष ठेऊन आहोत. आतापर्यंत आम्हाला मिळालेल्या माहितीवरून ७ ऑक्टोबरच्या हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी इराणचा थेट संबंध आढळलेला नाही.”

“हमासच्या हल्ल्यात इराणचा थेट संबंध आढळलेला नाही”

“हमासला पैसे पुरवणं, प्रशिक्षण देणं अशी मदत करण्याशी इराणचा संबंध असल्याचं तुम्ही ऐकलं आहे. त्यामुळे इराणचीही काही जबाबदारी आहेच. मात्र, हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात इराणचा थेट काहीही संबंध आढळलेला नाही. आमचं त्यावर सातत्याने लक्ष आहे,” असंही पॅट रायडर यांनी नमूद केलं.

“रागाच्या भरात कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका”

दरम्यान, जो बायडेन बेंजामिन नेतन्याहू यांना म्हणाले होते, “अमेरिकेवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही ज्या चुका केल्या, तुम्ही त्या चुकांची पुनरावृत्ती करू नका. बायडेन म्हणाले, मी इथे येऊन जगाला दाखवून देणार होतो की आम्ही इस्रायलबरोबर खंबीरपणे उभे आहोत. हमासने निर्दयीपणे इस्रायली जनतेची कत्तल केली आहे. ते इसिसपेक्षा वाईट आहेत. इस्रायलला त्यांचं स्वसंरक्षण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. यात अमेरिका नक्कीच इस्रायलची मदत करेल.”

हेही वाचा : इस्रायल-हमास युद्धावरून जो बायडेन यांना अमेरिकन खासदाराने सुनावलं, म्हणाल्या, “जागे व्हा आणि…”

“बहुसंख्य पॅलेस्टिनी नागरिक म्हणजे हमास नव्हे”

“मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, बहुसंख्य पॅलेस्टिनी नागरिक म्हणजे हमास नव्हे. त्याचबरोबर हमास पॅलेस्टाईनचं प्रतिनिधीत्व करत नाही. दरम्यान, अमेरिकेने पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासवर अनेक अनेक निर्बंध लादले आहेत. हमासची आर्थिक नाकेबंदी करणं हे यामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. हमासचे सदस्य आणि त्यांना पैसे पुरवणारे फायनान्सर या निर्बंधांच्या कक्षेत येतील, असा विश्वास बायडेन यांनी व्यक्त केला आहे. हमासने बेकायदेशीरपणे लाखो डॉलर्स मिळवल्याचा दावा बायडेन प्रशासनाने केला आहे. त्यामुळेच अमेरिकेने निर्बंधांचं शस्त्र उपसलं आहे,” असंही बायडेन यांनी नमूद केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America comment on speculation of iran link with hamas attack on israel pbs
Show comments