अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा यांची फेरनिवड झाल्यानंतर सर्वाची उत्सुकता लागून राहिलेल्या अमेरिकेचे प्रतिनिधीगृह आणि सिनेटच्या निवडणुकांचे निकाल पुढे आले आहेत, ज्यामध्ये प्रतिनिधीगृहात रिपब्लिकनांना आणि सिनेटमध्ये डेमोक्रॅटस्ना वर्चस्व मिळाले आहे. सिनेटच्या एकूण १०० पैकी ३३ जागांसाठी, तर प्रतिनिधीगृहाच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४३५ जागांसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या अंती सिनेटमधील १०० पैकी ५२ जागांवर डेमोक्रॅटिक पक्षाने आणि ४४ जागांवर रिपब्लिक पक्षाने वर्चस्व राखले, तर प्रतिनिधीगृहात, रिपब्लिकन पक्षाची सदस्यसंख्या २२४ आणि डेमोक्रॅटिक पक्षाची सदस्यसंख्या १७१ झाली आहे.
‘जनतेने करवाढीच्या प्रस्तावास केलेला विरोध’ असा या विजयाचा अर्थ असल्याचे रिपब्लिकन पक्षाने म्हटले आहे. मात्र रिपब्लिकन दाव्याला टोला होणताना ‘ही राजकारण करीत बसण्याची वेळ नाही,’ अशी प्रतिक्रिया डेमोक्रॅटस्तर्फे व्यक्त करण्यात आली आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा