अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यामध्ये मंगळवारी सिंगापूरमध्ये ऐतिहासिक भेट होणार आहे. ही भेट यशस्वी ठरली तर परस्परांचे कट्टर शत्रू असलेल्या अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये नव्या मैत्रीपर्वाची सुरुवात होऊ शकते. जागतिक शांततेच्या दृष्टीकोनातून ही भेट अत्यंत महत्वाची असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. पण चीन या भेटीमुळे पुरता अस्वस्थ झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या भेटीनंतर चीन-उत्तर कोरियासंबंध पूर्वीसारखे राहतील ?, शीत युद्धाच्या काळापासूनच मित्र आपल्यासोबत राहील का ? याची चिंता चिनी नेत्यांना सतावत आहे. उत्तर कोरिया-चीन संबंधात चीनचा जो प्रभाव राहिला आहे तो कमी करण्यासाठी उत्तर कोरिया अमेरिकेच्या निकट जाऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. आपली अणवस्त्र नष्ट करण्याच्या मोबदल्यात किम अमेरिकेबरोबर करार करु शकतात.

चीनवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी उत्तर कोरिया अमेरिकेबरोबर करार करु शकतो. सध्या उत्तर कोरिया पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. तुम्ही इतिहास पाहिला तर उत्तर कोरियाला कधीही चीनबद्दल पूर्ण खात्री राहिलेली नाही. त्यांची नेहमीच बदल्याची मानसिकता राहिली आहे असे उत्तर कोरियाच्या विषयावरील चिनी अभ्यासक शेन झीहुआ यांनी सांगितले.

सर्वात वाईटात वाईट म्हणजे अमेरिका, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया एकत्र येऊन चीनला एकाकी पाडू शकतात. उत्तर आणि दक्षिण कोरियाला एकत्र आणण्यासाठीही अमेरिका सिंगापूरच्या परिषदेचा वापर करु शकते. दोन्ही कोरिया उद्या एकत्र झाले तर अमेरिकन सैन्य थेट चीनच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचेल हीच चीनची मुख्य चिंता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America north korea summit china jittery