सध्या देशात दिवाळीची धूम आहे. देशभरातील बाजारपेढा सध्या फुलल्या असून खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. करोना महासाथीनंतर पहिल्यांदाच दीपावली सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय. हा सण फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेतही साजरा केला जातोय. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनीदेखील त्यांच्या निवासस्थानी दीपावली सण साजरा केला आहे. त्यांनी वॉशिंग्टन येथील आपल्या निवासस्थानी फटाके फोडून समस्त भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा >> दीपाली सय्यद नाराज आहेत? शिंदे गटात जाणार का? दिली सर्व प्रश्नांची उत्तरं, म्हणाल्या “माझी कोणावरही…”
कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला तसेच आशियाई-अमेरिकेन उपराष्ट्राध्यक्षा आहेत. कमला हॅरिस यांच्यासोबत त्यांचे पती डग एमहॉफ (Doug Emhoff)यांनीदेखील आनंदात दिवाळी सण साजरा केला आहे. तसे काही व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. कमला हॅरिस यांच्यासह अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दीपावली सण साजरा करत भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा >> विश्लेषण: पाकिस्तान FATF च्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर; पण म्हणजे नेमकं काय? भारताचा विरोध का?
अमेरिकेतील स्थानिक वृत्तपत्रांनुसार न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध असणाऱ्या टाईम्स स्क्वेअर येथे दीपावली उत्सवाला सुरुवात झालेली आहे. येथे अमेरिकेतील तसेच मूळचे भारतीय नागरिक मोठ्या उत्साहात फटाके फोडून दीपोत्सव साजरा करत आहेत. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी वर्षापासून दीपावलीनिमित्त न्यूयॉर्कमधील शाळांना सुटी असेल, असे अॅडम्स यांनी जाहीर केले आहे. सर्वसमावेशकतेचा पुरस्कार करण्यासाठी तसेच प्रकाशाचा उत्सव साजरा करण्यात मुलांनी सहभागी व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यतात आला आहे, असेही अॅडम्स यांनी सांगितले आहे.