अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे एका सहा वर्षीय मुलाने आपल्या शिक्षिकेवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिचनेक प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. सध्या शिक्षिकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिक्षक आणि गोळीबार करणाऱ्या मुलामध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हर्जिनियामधील रिचनेक प्राथमिक शाळेत एका सहा वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेवर गोळी झाडली आहे. या हल्ल्यात शिक्षिका जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिक्षिका आणि ६ वर्षीय मुलामध्ये भांडण झाले होते. याच कारणामुळे मुलाने शिक्षिकेवर पिस्तुलाने गोळीबार केला.

हेही वाचा >>> महिलेला फरपटत नेत मंदिराबाहेर काढलं; पुजाऱ्यासह मंदिरातील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

“या गोळीबाराच्या घटनेत अन्य कोणत्याही विद्यार्थ्यांचा समावेश नव्हता. अजूनही आम्ही या घटनेचा अधिक तपास करत आहोत. या ६ वर्षांच्या मुलाकडे पिस्तूल कसे आले. मुलाने शिक्षिकेवर गोळीबार केला, तेव्हा नेमके काय घडले होते? या सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरं शोधत आहोत,” असे येथील पोलीस अधिकारी स्टीव्ह ड्र्यू यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर रिचनेक प्राथमिक शाळा काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America virginia 6 year old student firing on female teacher prd