सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेचे माजी संचालक डेव्हिड पेट्रीएस यांच्याशी विवाहबाह्य संबंध असणाऱ्या एका महिलेशी असभ्य संभाषण केल्याच्या आरोपावरून अमेरिकेचा अफगाणिस्तानातील उच्चपदस्थ लष्करी अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यात सापडला आह़े
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात डेव्हिड यांना गेल्याच आठवडय़ात तडकाफडकी आपला राजीनामा द्यावा लागला होत़ त्यामुळे या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आह़े अमेरिकी अधिकारी जनरल जॉन अॅलेन यांच्याबद्दलच्या या प्रकरणाची माहिती अमेरिकी तपास संस्था एफबीआयकडून आपल्याला देण्यात आल्याचे अमेरिकेचे सुरक्षा सचिव लिऑन पॅनेट्टा यांनी मंगळवारी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आह़े डेव्हिड यांचे संबंध असणाऱ्या पॉला बॉडवेल या महिलेशी असभ्य संभाषण केल्याचा आरोप अॅलेन याच्यावर आह़े, परंतु हा आरोप फेटाळून लावत, पॉला हिच्याकडूनच आपल्याला धमकीचे ई-मेल आल्याचा प्रतिआरोप अॅलेनने केला आह़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा