वृत्तसंस्था, न्यू यॉर्क

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर रिपब्लिकन पक्षाच्या रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर आपली छाप सोडली, ती त्यांच्या निवृत्तीनंतरही अनेक वर्षे टिकून राहिली. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण किसिंजर यांच्या हातात असताना आणि नंतरही ते एकाच वेळी प्रशंसा आणि बदनामीचे धनी झाले होते.

Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : रतन टाटांच्या निधनानंतर टाटा सन्सच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया; म्हणाले, “टाटा समूहच नाही तर राष्ट्राची रचना…”
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
rupay card launch in maldives
भारताच्या ‘RuPay’ कार्डची सेवा आता मालदीवमध्येही; इतर कोणकोणत्या देशांत चालतं रुपे कार्ड? त्याचा फायदा काय?
mohhammad mizzu meet india
भारतविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौर्‍यावर; या दौर्‍यामागील त्यांचा उद्देश काय?
ajit pawar ncp searching president for pimpri chinchwad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये शहराध्यक्ष मिळेना
Joe Biden comments at the Quad meeting that China is testing us
चीनकडून ‘आपली’ परीक्षा! ‘क्वाड’ बैठकीत बायडेन यांची टिप्पणी; ‘हॉट माइक’मुळे जगजाहीर
Prime Minister Narendra modi arrives in America for Quad conference
‘क्वाड’ परिषदेसाठी पंतप्रधान अमेरिकेत दाखल; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
Joe Biden maintains Donald Trumps India-policy and takes it to the heights
बायडेन यांनी ट्रम्प यांचे भारत-धोरण राखले आणि उंचीवर नेले…

रिचर्ड निक्सन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात किसिंजर हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख शिल्पकार मानले गेले. वॉटरगेट प्रकरणात निक्सन यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांनी गेराल्ड फोर्ड यांच्याबरोबरही परराष्ट्रमंत्री म्हणून काम केले. निवृत्तीनंतरच्या आयुष्यातही ते कठोर आणि ठाम मते मांडत राहिले. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि व्यापक अनुभव यामुळे किसिंजर यांची प्रशंसा होत असतानाच, इतर देशांमध्ये विशेषत: लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये कम्युनिस्टविरोधी हुकुमशहांना दिलेल्या पािठब्यासाठी त्यांना युद्ध गुन्हेगार मानणाराही एक वर्ग आहे. व्हिएतनाम युद्धातील अमेरिकेने माघार घेण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना १९७३मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार संयुक्तरीत्या देण्यात आला. मात्र, तो पुरस्कार सर्वात वादग्रस्त पुरस्कारांपैकी एक ठरला आणि नोबेल पुरस्कार समितीच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला. शांतता चर्चेत सहभागी असलेले उत्तर व्हिएतनामचे मुत्सद्दी ले डुक थाओ यांनाही पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्यांनी तो नाकारला.

गेराल्ड फोर्ड यांनी किसिंजर यांचे वर्णन ‘सुपर परराष्ट्रमंत्री’ असे केले होते, त्यांच्या स्वभावातील काटेरीपणा आणि स्वत:विषयी खात्री यांचाही उल्लेख केला होता. किसिंजर यांच्या टीकाकारांनी त्याच स्वभाववैशिष्टय़ांचे वर्णन विभ्रमित करणारी भीती (पॅरानॉय) आणि अहंकार असे केले. ‘आपण कधीही चूक करत नाही’, असेच हेन्री यांना वाटते, असे वक्तव्य फोर्ड यांनी २००६मध्ये दिलेल्या मुलाखतीत केले होते.

हेही वाचा >>>Madhya Pradesh Exit Poll : काँग्रेस भाजपाला धक्का देणार? तीन एग्झिट पोल कमलनाथ यांच्या बाजूने

परराष्ट्र विभागातील कारकीर्द

किसिंजर यांनी दीर्घकाळ अमेरिकी सरकारच्या संस्थांमध्ये सल्लागार म्हणून काम केले. १९६७ मध्ये त्यांनी व्हिएतनाममध्ये परराष्ट्र खात्याचे मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली. तेथील त्यांचे काम पाहून निक्सन यांनी त्यांची १९६८मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या काळात त्यांनी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरले. किसिंजर यांनी १९६९ ते १९७७ दरम्यान रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केले. व्हिएतनाम युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल १९७३ मध्ये उत्तर व्हिएतनामच्या ले दुक थाओ यांच्याबरोबर त्यांना संयुक्तपणे शांततेसाठी पुरस्कार मिळाला. १९७७मध्ये निवृत्तीनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय सल्लागार, व्याख्याते आणि लेखक म्हणून नाव कमावले. पुढे १९८३मध्ये तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी त्यांची मध्य अमेरिकेसाठी नॅशनल कमिशनचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली.

व्हिएतनाम युद्धातील कामगिरी

व्हिएतनाम युद्धाची जबाबदारी पाच लाख अमेरिकी सैनिकांवरून दक्षिण व्हिएतनामींवर टाकण्याची प्रक्रिया दीर्घकाळ लांबली आणि मोठय़ा प्रमाणात रक्तपात झाला. यादरम्यान अमेरिकेने उत्तर व्हिएतनाम आणि कम्बोडियामध्ये मोठय़ा प्रमाणात बॉम्बवर्षांव केला. १९७३मध्ये किसिंजर यांच्यावर परराष्ट्रमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्र धोरण एकहाती त्यांच्याकडे गेले असे मानले जाते.

अरब-इस्रायल समझोत्यासाठी प्रयत्न : अरब-इस्रायल संघर्षांदरम्यान किसिंजर यांनी वारंवार त्या देशांचे दौरे केले. याला किसिंजर यांनी शटल मिशन असे नाव दिले. परराष्ट्र धोरणाचे वैयक्तिकीकरण, जास्त दबाव टाकण्याची मुत्सद्देगिरी यासाठी ते प्रसिद्ध झाले. या काळात त्यांनी जेरुसलेम आणि दमास्कसदरम्यान प्रवासात ३२ दिवस घालवले.

हेन्री किसिंजर यांचे भारताबरोबरचे संबंध आधी अतिशय कटू आणि नंतर काही प्रमाणात सुधारणा असे राहिले. १९७१च्या बांगलादेश युद्धादरम्यान रिचर्ड निक्सन आणि हेन्री किसिंजर यांनी भारताविरोधात पाकिस्तानला भक्कम पाठिंबा दिला होता.

त्या युद्धाच्या काळाविषयी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले, की ‘‘अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि हेन्री किसिंजर यांनी भारतासाठी डोकेदुखी निर्माण केली होती. पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे सहाय्यक पी एन हस्कर यांनी त्यांना सडतोड उत्तर दिले होते.’’

बांगलादेश युद्धामध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी पाठवलेल्या लढाऊ नौका असो किंवा किसिंजर यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल आणि सर्व भारतीयांविषयी काढलेले अपशब्द असो, किसिंजर यांच्याकडे भारतामधून खलनायक म्हणूनच पाहिले गेले. या युद्धादरम्यान आणि संपूर्ण शीतयुद्धाच्या काळात किसिंजर पाकिस्तानच्या बाजूने झुकलेले राहिले. काळाच्या ओघात किसिंजर यांचे इंदिरा गांधी यांच्याविषयीचे मत बदलले. २००५मध्ये ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या अपशब्दांविषयी खेद व्यक्त केला होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या कार्यकाळात हेन्री किसिंजर यांनी भारत दौरा केला. त्यावेळी त्यांनी मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीत भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

चीनबरोबर औपचारिक संबंध प्रस्थापित

शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाचा प्रभाव कमी करण्यासाठी किसिंजर यांनी चीनचा दोन वेळा दौरा केला. त्यानंतर रिचर्ड निक्सन यांनी बीजिंगचा ऐतिहासिक दौरा केला आणि माओ झेदाँग यांच्याशी चर्चा केली. या दौऱ्यानंतर दोन्ही देशांमध्ये औपचारिक द्विपक्षीय संबंधांना सुरुवात झाली.

रशियाबरोबर शस्त्रनियंत्रण करार

व्हिएतनाम आणि चीनबरोबरच किसिंजर यांनी रशियाबरोबर शस्त्रनियंत्रण करार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. किसिंजर आणि तत्कालीन अध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांनी १९७४मध्ये रशियाचा दौरा केला. सोव्हिएत रशियाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनॉईड ब्रेझनेव्ह यांची त्यांनी भेट घेतली. त्या भेटीमध्ये शस्त्र कराराचा प्राथमिक आराखडय़ावर सहमती झाली. अमेरिका-रशिया शस्त्र नियंत्रण करार हा किसिंजर यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा मानला जातो. या करारामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला.