कुवेतमधून इराकी फौजांना हटविण्यासाठी आखलेल्या १९९१च्या ‘ऑपरेशन डेझर्टस्टॉर्म’ मोहिमेतील अमेरिकेचे सेनाप्रमुख जन. (निवृत्त) एच. नॉर्मन श्वार्झकॉफ यांचे फ्लोरिडाजवळच्या टाम्पा येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लिऑन पॅनेटा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, जन. श्वार्झकॉफ हे मुत्सद्दी, धोरणी आणि प्रेरक नेतृत्वगुणांनी युक्त होते. व्हिएतनाम आणि कुवेतमधील मोहिमांतील त्यांच्या कर्तृत्वाने अमेरिकेची बाजू अधिक सुरक्षित आणि भक्कम झाली, असे अध्यक्षीय प्रासादाचे प्रसिद्धी सचिव जे कार्ने यांनी सांगितले.
सध्या टेक्सास रुग्णालयात अतिदक्षता विभागात असलेले माजी अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांनीही पत्रकाद्वारे जन. श्वार्झकॉफ यांना आदरांजली वाहिली आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा