जन्माने श्रीलंकन असलेल्या अमेरिकी नागरिकाला विनोदी दृश्यफीत यूटय़ूबवर टाकल्यानंतर त्याला संयुक्त अरब अमिरातीने गेले नऊ महिने तुरुंगात टाकले असून त्याची सुटका लवकरच होण्याची शक्यता आहे, असे एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले.
अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जेन साकी यांनी सांगितले, की २९ वर्षे वयाच्या शेझान ऊर्फ शेझ कासिम याला एक वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली होती, त्याचे तुरुंगवासातील काळात त्याचे वर्तन चांगले राहिल्याने त्याची सुटका करण्यात येणार असल्याचे संकेत आम्हाला मिळाले आहेत.
कासिम याला मायदेशी पाठवण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काही दिवसातच तो अमेरिकेत परतेल. कासिमला अबुधाबी येथील अमेरिकी दूतावासाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा