अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने माहिती मिळवण्यासाठी किती विनंत्या पाठवल्या होत्या, याची माहिती मायक्रोसॉफ्ट व फेसबुक या अमेरिकी इंटरनेट तंत्रज्ञान कंपन्यांनी जाहीर केली आहे. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ असलेल्या फेसबुकने म्हटले आहे की, २०१२ मधील शेवटच्या सहा महिन्यांत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने माहिती मिळवण्यासाठी नऊ ते दहा हजार विनंत्या पाठवल्या होत्या. स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थेला एका मुलाच्या अपहरणाबाबत हवी असलेली माहिती ते अतिरेक्यांच्या धमक्या अशा अनेक प्रकारची माहिती त्यांनी मागितली होती. किमान १८ ते १९ हजार फेसबुक अकाउंटशी संबंधित अशी ही माहिती होती. मायक्रोसॉफ्टकडे ३१ डिसेंबर २०१२ रोजी संपलेल्या वर्षांतील शेवटच्या सहा महिन्यांत ३२ हजार अकाउंटची माहिती मागण्यात आली होती. एकूण ६००० ते ७००० विनंत्या त्यात होत्या. गुन्हेगारी प्रकरणे व इतर घटनांशी संबंधित माहिती त्यांना यात हवी होती, असे मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष जॉन फ्रँक यांनी सांगितले. जागतिक ग्राहकांचा विचार करता माहिती मागवण्यात आलेल्या अकाउंटची संख्या नगण्य आहे असे फेसबुक व मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. अमेरिकी सुरक्षा संस्थेने अशा प्रकारे टेहळणीसाठी माहिती घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या दोन्ही कंपन्यांनी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने इंटरनेट हेरगिरी कार्यक्रमाअंतर्गत केलेल्या विनंत्यांची संख्या जाहीर करण्याची मागणी केली होती.
अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने घेतली ५१ हजार अकाउंट्सची माहिती
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने माहिती मिळवण्यासाठी किती विनंत्या पाठवल्या होत्या, याची माहिती मायक्रोसॉफ्ट व फेसबुक या अमेरिकी इंटरनेट तंत्रज्ञान कंपन्यांनी जाहीर केली आहे. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ असलेल्या फेसबुकने म्हटले आहे की, २०१२ मधील शेवटच्या सहा महिन्यांत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने माहिती मिळवण्यासाठी नऊ ते दहा हजार विनंत्या पाठवल्या होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-06-2013 at 03:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American national security agency has taken information of 51 thousand accounts