अमेरिकेतून भारतात डुकराच्या मांसाची आयात करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परवानगी देण्यात आली असून ऐतिहासिक पाऊल म्हणून या घटनेकडे पाहिलं जात आहे. अमेरिकेतील डुकरांपासून तयार केलेली विविध उत्पादनं आता भारतात आयात करणं या निर्णयामुळे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे भारताची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली झाली असून अमेरिकेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

अमेरिकेतून भारतात येणाऱ्या विविध कृषी उत्पादनांपैकी डुक्कर आणि संबंधित उत्पादने हे एक महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे. मात्र इतर कृषी उत्पादनांप्रमाणं डुकराचं मांस भारतात आयात करायला आतापर्यंत सरकारनं परवानगी दिली नव्हती. यासंदर्भात द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परवानगी देण्यात आली असून भारताचे दरवाजे आता पोर्क आणि पोर्क प्रॉ़डक्टसाठी खुले झाले आहेत.

Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
Foodgrain production during Kharif season Crop wise production forecast of Central Government Mumbai
यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार; जाणून घ्या, केंद्र सरकारचा पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज
Leader of Opposition in Lok Sabha and Congress leader Rahul Gandhi.
Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?
samosa caucus
समोसा कॉकस म्हणजे काय? अमेरिकेच्या निवडणुकीत का चर्चेत?
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल

अमेरिकेतून होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंच्या निर्यातीपैकी डुकरांचं मांस आणि त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचं प्रमाण मोठं आहे. २०२० मधील आकडेवारीनुसार अमेरिका हा डुकरांच्या मांसाचं उत्पादन करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे, तर या पदार्थांची निर्यात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अमेरिकेनं गेल्या वर्षात जवळपास ५ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या डुकरांच्या मांसाची निर्यात केली आहे. या निर्णयामुळे भारताच्या बाजारपेठेत अमेरिकी मांसाला व्यापाराची मुभा मिळणार आहे.