अमेरिकेचे राष्ट्रपती  जो बायडेन यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. रशियाने जर रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याची रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल असं बायडन म्हणाले आहे. अमेरिका युक्रेनमध्ये रशियाशी लढणार नाही. तसंच नाटो आणि क्रेमलिनच्या दरम्यान भिडल्यास तिसरं महायुद्ध होईल, असा इशाराही  जो बायडेन यांनी दिला आहे. तसंच युक्रेनसोबतच्या लढाईत रशिया कधीच जिंकणार नाही, असंही बायडन म्हणाले आहेत.


२४ फेब्रुवारी रोजी रशियाच्या सैन्याने युक्रेनवर हल्ला केला. २७ फेब्रुवारीला मॉस्कोने युक्रेनमधली दोन वेगळी क्षेत्रं डोनेट्स्क आणि लुहान्स्कला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना  जो बायडेन यांनी सांगितलं की आम्ही युरोपात आमच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देणं सुरूच ठेवणार आहोत. आम्ही संपूर्ण ताकदीनिशी नाटो क्षेत्राच्या इंच न इंच भागाचं रक्षण करू आणि नाटोमधल्या अन्य देशांनाही यासाठी प्रेरित करू. त्यांनी सांगितलं की आम्ही युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. बायडन यांनी सांगितलं की नाटो आणि रशिया थेट भिडल्यास तिसर महायुद्ध होईल. आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न करू.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”


या आधी बायडन यांनी रशियाची दारू, सी-फूड आणि हिऱ्यासह अन्य व्यापारी संबंधांवर निर्बंध लावण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी बायडन म्हणाले की आता जग पुतीन यांचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहे.