गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी दिल्लीतील एका रेस्तराँनं मोदींना समर्पित थाळी तयार केली होती. या थाळीचं नावच ‘५६ इंच’ असं ठेवण्यात आलं होतं. या थाळीत बरोबर ५६ पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अशाच एका थाळीची जोरदार चर्चा रंगली आहे. या थाळीचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने न्यू जर्सीमधील एका रेस्तराँनं ‘मोदीजी थाळी’ तयार केली आहे. या थाळीचं लवकरच अनावरण करण्यात येणार आहे. याचबरोबर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या नावाने ‘जयशंकर थाळी’चाही या रेस्तराँनं समावेश केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ तारखेपासून २४ तारखेपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी अमेरिकेच्या संयुक्त सभागृहांसमोर अभिभाषणही करणार आहेत. दुसऱ्यांदा अशा प्रकारे अमेरिकी संसदेसमोर भाषण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळींची मोदी भेट घेणार आहेत.

मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने थाळी!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने न्यू जर्सीमधील एका रेस्तराँनं ‘मोदीजी थाळी’ तयार केली आहे. शेफ श्रीपाद कुलकर्णी यांनी ही थाळी तयार केली आहे. भारतीय विविधतेचं दर्शन या थाळीतील पदार्थांवरून होणार आहे. या पदार्थांमध्ये खिचडी, रसगुल्ला, सरसो दा साग, दम आलू, कश्मिरी, इडली, ढोकळा, ताक आणि पापड यांचा समावेश आहे.

नुकतंच अमेरिकेने भारत सरकारच्या विनंतीवरून २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केलं आहे. त्यानुसार या थाळीमध्ये तृणधान्यापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांचाही समावेश करण्यात आला आहे.

Video : बिपरजॉय चक्रीवादळ दिशा बदलणार? पाकिस्तान नव्हे, आता गुजरातच्या दिशेनं वळवला मोर्चा; सतर्कतेचा इशारा!

एस जयशंकर थाळी!

दरम्यान, लवकरच एस. जयशंकर थाळीही लाँच करण्याचा मानस रेस्तराँचे मालक मल्होत्रा यांनी व्यक्त केला आहे. “आम्ही मोदीजी थाळी लवकरच लाँच करण्याचं नियोजन केलं आहे. मला खात्री आहे की या थाळीला लोकांची चांगली पसंती मिळेल. एकदा ही थाळी लोकप्रिय झाली, की आम्ही डॉ. जयशंकर थाळी लाँच् करण्याचंही नियोजन केलं आहे. कारण भारतीय अमेरिकन लोकांमध्ये जयशंकर लोकप्रिय आहेत”, अशी माहिती मल्होत्रा यांनी दिली.

Live Updates
Story img Loader