इसिसच्या ताब्यात असलेली अमेरिकी अपहृत महिला कायला म्युलर (२६) ही जॉर्र्डनच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचा दावा इसिसने केल्यानंतर ती मरण पावली असल्याचे ‘व्हाइट हाऊस’कडून सांगण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी यास दुजोरा दिला आहे.
कायला म्युलर या ठार झाल्याचे निवेदन इसिसने शुक्रवारी जारी केले होते; परंतु त्या संबंधी कोणताही ठोस पुरावा न आढळल्यामुळे इसिसच्या या निवेदनावर अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी तीव्र संशय व्यक्त केला होता. याखेरीज म्युलरच्या कुटुंबीयांनाही गेल्याच आठवडय़ात इसिसमार्फत एक खासगी संदेश मिळाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुप्तचर अधिकाऱ्यांना या संबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही माहितीची शहानिशा केली आणि म्युलर मरण पावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, म्युलर यांचे निधन केव्हा आणि कसे झाले, याबद्दल स्पष्टता नसल्याचा दावा काही अधिकाऱ्यांनी केला आहे.

Story img Loader