मतमोजणीची घटिका जवळ आल्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देशात मोदी सरकार येण्याची शक्यता एक्झिट पोल्सनी वर्तविल्यानंतर सर्वाधिक घडामोडी भाजपच्या गोटात घडत आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुरेश सोनी यांच्याशी चर्चा केली. मतमोजणीनंतरची रणनिती ठरविण्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
देशात भाजपच्या नेतृत्त्वाखाली सरकार येण्याची चिन्हे असल्यामुळे पक्षसंघटनेत आमुलाग्र बदल करण्याची शक्यता आहे. त्यावरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्याचबरोबर मतमोजणीनंतर देशात तयार होणाऱया संभाव्य राजकीय घडामोडींवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
सत्तास्थापन करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घेण्यास भाजप तयार असल्याचे पक्षाने याआधीच स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीनेही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपचे संघटन महामंत्री रामलाल हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.
दिल्लीमध्ये बैठकींचा धडाका; भाजपमध्ये आमुलाग्र बदलांची शक्यता
मतमोजणीची घटिका जवळ आल्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
First published on: 15-05-2014 at 04:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amid talks of drastic change in bjp rajnath meets rss leader soni