मानव संसाधन आणि माहिती व प्रसारण मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत राहिलेले अमित खरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलं आहे. खरे हे १९८५ च्या आयएएसच्या बॅचचे अधिकारी असून ३० सप्टेंबर रोजी ते उच्चशिक्षण सचिव या पदावरून निवृत्त झाले. एका सरकारी आदेशाच्या माध्यमातून खरे यांच्या सल्लागारपदी झालेल्या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरे पंतप्रधान कार्यालयात सल्लागारपदी काम करणार आहेत. कंत्राटी पद्धतीने ते या पदावर काम करणार असून किमान दोन वर्षे अथवा पुढचा आदेश येईपर्यंत त्यांची नियुक्ती कायम राहणार आहे. देशात यंदाच्या वर्षी लागू करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्याचबरोबर डिजीटल माध्यमांसाठीचे नियम तयार करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिजीटल मीडियासंदर्भातले नवे नियम जारी केले होते.

काय आहे खरे यांचा लालूप्रसाद यादवांशी संबंध?

अमित खरे यांनीच लालूप्रसाद यादव यांच्या संदर्भातल्या मोठ्या चारा घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. खरे यांची नियुक्ती जेव्हा चाईबासा इथं उपायुक्त म्हणून कऱण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी या घोटाळ्याबद्दल खुलासा केला होता. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसं लालूप्रसाद यांच्यावरचे आरोप अधिक पक्के होत गेले आणि अखेर त्यांना जेलची हवा खावीच लागली.