समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अमित शहा यांचा उल्लेख गुंड आणि मारेकरी म्हणून केला आहे. तसेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेसुद्धा मुस्लिमांचे शत्रू असल्याचे म्हटले आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवार सुधान रावत यांच्यासाठी आझम खान यांनी गाझियाबाद येथील मसुरी या मुस्लिमबहुल भागात प्रचार केला. यावेळी अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडताना अमित शहा यांचा गुंड म्हणून उल्लेख करणे आमच्यासाठी नाईलाजाचे आहे, कारण कोणत्याही मारेक-यास शुद्ध चारित्र्याचे प्रमाणपत्र दिले जाऊ शकत नसल्याचे आझम खान यांनी सांगितले. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींना नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप आझम खान यांनी केला. मुस्लिमांचा उल्लेख ‘कुत्र्याचे पिल्लू’ म्हणून करणारा नेता कधीच मुसलमानांच्या हितासाठी काम करू शकत नसल्याचे आझम खान यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदींची धोरणे ही नेहमीच हिंदू आणि मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करणारी असतात. यावेळी कारगिल युद्धासंदर्भात विधान करताना कारगिलचे युद्ध जिंकण्यात हिंदू सैनिकांचा नाही तर मुस्लिम सैनिकांचा सहभाग असल्याचे आझम खान यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah a goonda qatil azam khan