पीटीआय, राजनांदगाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास तो मतपेढीसाठी ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ करणे सुरूच ठेवेल, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केला. उपाहारगृहांच्या अन्नसाखळीप्रमाणे काँग्रेसने दिल्लीपर्यंत ‘भ्रष्टाचाराची साखळी’ तयार केली आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेवर आला, तर आम्ही भ्रष्ट लोकांकडून पै न पै वसूल करू आणि त्यांना उलटे टांगू, असे राजनांदगाव शहरात एका प्रचारसभेतील भाषणात शहा म्हणाले.अविभाजित मध्य प्रदेश- छत्तीसगड हे काँग्रेसच्या राजवटीत ‘आजारी राज्य’ होते, मात्र २००३ साली रमण सिंह छत्तीसगडमध्ये सत्तेवर आल्यानंतरच्या १५ वर्षांत ते विकसित राज्य बनले, असा दावा शहा यांनी केला.

 बेमेतरा जिल्ह्यातील बिरनपूर खेडय़ात एप्रिलमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारावरून शहा यांनी भूपेश बघेल सरकारवर हल्ला चढवला. ‘छत्तीसगड हे पुन्हा जातीय दंगलींचे केंद्र झालेले तुम्हाला हवे आहे काय’, असा प्रश्न अमित शहा यांनी यावेळी लोकांना विचारला.