गृहमंत्री अमित शाहा यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. तर, काँग्रेसला आताचा आकडाही पार करता येणार नाही, असा दावा गृहमंत्री शाह यांनी केला आहे. अमित शाहा आसामच्या दौऱ्यावर आहेत. गृहमंत्र्यांनी ४४ हजार ७०३ जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्र दिली. तेव्हा ते बोलत होते.

“२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. काँग्रेसने विरोधी पक्षाचा दर्जा गमावला आहे. सध्या लोकसभेत मिळालेल्या जागाही काँग्रेसला २०२४ साली मिळणार नाही,” असं गृहमंत्री शाह यांनी म्हटलं.

हेही वाचा : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधी पक्षाचा बहिष्कार, पंतप्रधान मोदी लक्ष्य करत म्हणाले…

“राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे, असं सांगत काँग्रेस बहिष्कार टाकून…”

“पंतप्रधान मोदींच्या हस्ते २८ मे रोजी नव्या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. पण, राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे, असं सांगत काँग्रेस बहिष्कार टाकून राजकारण करत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षातील राज्यांमध्ये विधानसभा इमारतींची पायाभरणी राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री किंवा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी केली होती,” अशी टीका अमित शाहांनी केली आहे.

हेही वाचा : “विरोधी पक्षाच्या सरकारबाबत भाजपाचा तीन कलमी कार्यक्रम, एकतर…”, अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप!

“पंतप्रधानांचा आदर न करणं याचा अर्थ…”

“काँग्रेस पंतप्रधान मोदींना संसदेत बोलू देत नाही. जनतेने मोदींना जनादेश दिला आहे. पण, पंतप्रधानांचा आदर न करणं याचा अर्थ जनतेच्या जनादेशाचा अपमान करण्यासारखं आहे,” असंही गृहमंत्री अमित शाहांनी सांगितलं.

Story img Loader