स्वाइन फ्लू झाल्यामुळे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना डिस्चार्ज मिळाला आहे. स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे त्यांना बुधवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमित शाह यांचा स्वाइन फ्लू बरा झाला असून त्यांना रविवारी सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती एम्सकडून देण्यात आली आहे.

याशिवाय, अमित शाह यांनी स्वतःदेखील याबाबत माहिती दिली, आणि माझी प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो असं ट्विट त्यांनी केलंय.  भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही ट्विटरद्वारे शाह यांचा स्वाइन फ्लू बरा झाला असून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली.

अमित शाह यांना बुधवारी सकाळपासूनच बरे वाटत नव्हते. छातीमध्ये दुखत होते तसेच अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास ते तपासणीसाठी एम्स रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी चाचणीमध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. त्यानंतर शाह यांनी स्वत: टि्वट करुन स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची  माहिती दिली होती.