अमेरिकेच्या माजी जगविख्यात टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा सध्या भारतामधील नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. अर्थात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक या निवृत्त झालेल्या माहिला टेनिसपटूची चर्चेत येण्यामागील कारणार काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे या महिला टेनिसपटूने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया.

झालं असं की एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाह कधीच नव्हते. भारतामधील आतापर्यंत सर्वाधिक चांगल्याप्रकारे लोकशाही मार्गाने काम करणारे ते नेते आहेत,” असं म्हटलं. मोदींना शाह यांनी मोस्ट डेमोक्रॅटीक म्हणजेच लोकशाहीचा सर्वाधिक आदर करणारे अशी उपाधी दिली.

याच ट्विटवर नवरातिलोवाने ट्विट केलं आहे. तिने अमित शाह यांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख असणाऱ्या वृत्तांकनाच्या पोस्टची लिंक शेअर करणारं ट्विट कोट करुन रिट्विट करताना हे वक्तव्य म्हणजे, “हा माझा पुढचा विनोद आहे,” असं म्हटलं आहे. म्हणजेच मोदी हे सर्वाधिक लोकशाही प्रिय नेते आहेत हे शाह यांचं वक्तव्य हस्यास्पद असल्याचा टोला नवरातिलोवाने लगावला आहे.

नवरातिलोवाच्या याच ट्विटवर एकाने तिला आता तुला भारतामधील उजव्या विचारसणीचे लोक ट्रोल करतील असं सांगितलं. तसेच आता नवरातिलोवाचं नाव भारत आणि अमेरिकेतील उजव्या विचारसणींच्या लोकांकडून ट्रोल झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत येणार असल्याचंही या व्यक्तीने म्हटलं. त्यावर नवरातिलोवाने रिप्लाय करुन ते सारे उजव्या विचारसणीचे लोक एकाच पद्धतीचं शिक्षण घेतात, त्यामुळे मला चिंता नाहीय, असा रिप्लाय केला.

नवरातिलोवाचं हे ट्विट ११ हजारहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आलं असून त्यावर तीन हाजारांहून अधिक कमेंट आहेत. तसेच २८ हजारांहून अधिक जणांनी हे ट्विट लाइक केलं आहे.

Story img Loader