केंद्रातल्या मोदी सरकारने अलीकडच्या काळात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित करण्यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने म्यानमारला लागून असलेल्या सीमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. म्यानमारमधून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार या सीमेवर कुंपण घालणार आहे. आसाममधील पोलीस कमांडोंच्या पासिंग आऊट परेडमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी या निर्णयाची घोषणा केली. बांगलादेशच्या धर्तीवर भारत सरकार आता म्यानमारला लागून असलेल्या सीमेवरही कुंपण घालणार आहे. भारत आणि म्यानमारमधील मुक्त हालचालींबाबत सरकार पुनर्विचार करत असल्याचंही शाह यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे केंद्र सरकार उभय देशांमधील नागरिकांचा सीमेवरील मुक्तसंचार बंद करू शकतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्र सरकार म्यानमारच्या सीमेवरून होणारी ये-जा बंद करण्याच्या विचारात आहे. याबाबत अमित शाह म्हणाले, “आपलं सरकार लवकरच म्यानमारची सीमा सुरक्षित करेल. यासह आपण सीमेवर कुंपण घालणार आहोत.” म्यानमारच्या सीमेवरून होणारी तस्करी अलीकडच्या काळात वाढली आहे. २०२१ पासून आतापर्यंत आसाम पोलिसांनी तब्बल १३,५६० तस्करांना अटक केली आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत ८,१०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईचा दाखला देत अमित शाह म्हणाले, ही सीमा सुरक्षित करणं आता आवश्यक आहे.

अमित शाह म्हणाले, निवडणुकीच्या वेळी आम्ही आसाममधील तरुणांना आश्वासन दिलं होतं की, कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय राज्यातील तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील. मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा सरकारने हे आश्वासन पूर्ण केलं आहे. काँग्रेसच्या काळात आसाममधील तरुणांना नोकरीसाठी पैसे मोजावे लागत होते. परंतु, आमच्या सरकारने इथल्या तरुणांना नोकऱ्या देताना कुठलाही भ्रष्टाचार होऊ दिला नाही. अनेकांची घरबसल्या उद्योगधंद्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Ram Mandir : “मुसलमानांच्या हत्येनंतर…”, प्राणप्रतिष्ठेआधी जैश-ए-मोहम्मदची भारताला धमकी; म्हणाले, “मंदिराची अवस्था…”

अमित शाह म्हणाले, भारत आता संपूर्ण जगात मोठी शक्ती म्हणून पुढे येतोय. आपला देश २०४७ मध्ये संपूर्ण विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून पुढे येईल. अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर याची सुरुवात होईल. यासह संपूर्ण ईशान्य भारतात नव्या युगाची सुरुवात होईल, तसेच सर्वत्र शांतता प्रस्थापित होईल.