जागतिक योग दिनाला देशातील मुस्लीम संघटनांनी विरोध दर्शविला असताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांना चक्क दोन मुस्लीम मुली योगा शिकविणार आहेत. यामुळे योगाविरोधात असणाऱ्या मुस्लीम संघटनांना ‘शह’ देण्याचा शहा यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
रुक्साना खातून आणि बिस्मिल्ला खातून अशी या मुस्लीम योगगुरूंची नावे असून या दोघी शहांसह केंद्रीय मंत्र्यांनाही २१ जून रोजी होणाऱ्या जागतिक योग दिनासाठी प्रशिक्षण देणार आहेत. याबाबतची माहिती बिहार-झारखंड पतंजली योगपीठाचे प्रमुख अजित कुमार यांनी दिली.
या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. त्या पूर्व चंपारण जिल्हय़ातील आहेत. योगामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून ऑस्ट्रिया व दक्षिण आफ्रिकेमधील लहान मुलांच्या स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. योगा हे कधीही जातपात, प्रांतामध्ये भेदभाव करत नसल्याचे कुमार यांनी सांगितले.
अमित शहांसह बिहारमधील केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, राधा मोहन सिंग, राजीव प्रताप रुडी, राम कृपाल यादव आणि गिरीराज सिंग यांना या दोघी योगाचे धडे देणार आहेत.
अमित शहांसाठी मुस्लीम योगगुरू
जागतिक योग दिनाला देशातील मुस्लीम संघटनांनी विरोध दर्शविला असताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांना चक्क दोन मुस्लीम मुली योगा शिकविणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-06-2015 at 12:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah to take yoga lessons from muslim teacher