उत्तर प्रदेशातील सर्वधर्मसमभावाची भावना भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांच्यामुळे नेस्तनाबूत होईल, अशी भीती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी मंगळवारी व्यक्त केली. समाजात फूट पाडण्याच्या अमित शाह यांच्या राजकारणाविरोधात आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही यादव यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, अमित शाह यांच्यासारखे नेते राजकारणात आहेत आणि त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाची जबाबदारी दिली आहे, ही अत्यंत दुर्दैवी स्थिती आहे. उत्तर प्रदेश ही रामाची, कृष्णाची, बुद्धाची, जयप्रकाश, लोहिया, अटलबिहारी वाजपेयी यांची भूमी आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासारखे नेते या प्रदेशात जे काही काम करीत आहेत, त्याचा आम्ही कायमच विरोध करू. अमित शाह यांचा इतिहास काय आहे, याची माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे. ज्यावेळी गुजरातमध्ये दंगल उसळली होती, त्यावेळी हेच शहा त्या राज्याचे गृहमंत्री होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले
भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री अशोक प्रधान आणि पक्षाचे माजी आमदार प्रेमप्रकाश तिवारी यांनी मंगळवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत मुलायमसिंह यादव यांनी शाह यांच्यावर टीका केली.
‘अमित शाह यांच्यामुळे सर्वधर्मसमभावाची भावना नेस्तनाबूत होईल’
समाजात फूट पाडण्याच्या अमित शाह यांच्या राजकारणाविरोधात आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही यादव यांनी स्पष्ट केले.
First published on: 08-04-2014 at 03:48 IST
TOPICSमुलायम सिंह यादवMulayam Singh Yadavलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah will destroy secular fabric of up