जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकताच ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे पुलवामा हल्ला झाला, असं ते म्हणाले. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मलिकांच्या आरोपांना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा – “आम्ही राजीव गांधींसारखे शब्द फिरवणारे…” अमित शाह यांनी सांगितला ३० वर्षांपूर्वीचा किस्सा

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

काय म्हणाले अमित शाह?

इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी सत्यपाल मलिकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. “सत्यपाल मलिकांना राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतरच या सर्व गोष्टी का आठवत आहेत? आणि त्यांना केलेले आरोप खरे असतील तर राज्यपाल पदावर असताना ते या विषयावर का बोलले नाही? याचा विचार आता जनतेने आणि माध्यमांनी करावा. खरं तर लोक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा अनेकदा त्यांचा विवेक जागा होत नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – पुलवामा हल्ल्याचे सत्य सांगणाऱ्या सत्यपाल मलिक यांना शेतकरी नेते आणि खाप पंचायतींचा पाठिंबा; शनिवारी दिल्लीत बैठक

“भाजपा सरकारला देशातील जनतेपासून काही लपवावे लागेल, असं कोणतंही कृत्य आम्ही केलेलं नाही. जर एखादी व्यक्ती राजकीय स्वार्थासाठी आमच्या विचारांशी दूर जाऊन आमच्यावरच आरोप करत असेल तर माध्यम आणि जनतेनेचे याचा विचार केला पाहिजे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – मलिकांना सीबीआय नोटीस, जम्मू-काश्मीरमधील विमा योजना गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी पाचारण

सत्यपाल मलिकांनी नेमके काय आरोप केले?

पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. “पुलवामा हल्ल्यापूर्वी सीआरपीएफनं एअरक्राफ्टची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडलाय असं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी मला शांत राहण्यास सांगितलं”, असं ते म्हणाले होते.